मुंबई : जगातून माणुसकी संपत चालली आहे की काय? असं वाटत असताना एखाद्या देवदूताचं दर्शन व्हावं. याहून चांगलं ते काय? सोशल मीडियावर अशाच एका देवदूताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक लहान मुलगी रस्ता क्रॉस करत आहे. ज्या मुलीच्या एका पायाला दुखापत झाली आहे. पण तिच्या  मदतीला चक्क देवदूत आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायाला दुखापत झाल्यामुळे रस्ता ओलांडताना ही चिमुकली थकते.   रस्ता ओलांडताना एका महिलेची नजर त्या मुलीवर पडते. रस्ता ओलांडताना चिमुकलीला होणारा त्रास पाहून त्या महिलेला फार त्रास झाला. 



महिलेने त्या मुलीला पाठीवर घेते. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुकलीला महिलेने दिलेला आधार खूप महत्वाचा वाटतो. हा व्हिडीओ सकारात्मक विचार समाजाला देतो. त्यामुळे प्रचंड व्हायरल होत आहे. 


या व्हिडीओमध्ये एक मुलगी रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे. मुलीच्या पायाला दुखापत झाली आहे. व्हिडिओमध्ये तिच्या एका पायाला पट्टी बांधलेली दिसत आहे. तर हातात कुबडी घेऊन चालताना ही मुलगी दिसत आहे.  


व्हिडीओमध्ये ती मुलगी रस्त्याच्या मधोमध खूप थकून थांबते. तिच्या बाजूने दोन तीन प्रवासी जातात पण तिच्यासाठी कुणीही थांबत नाही. 


मात्र त्यानंतर एक बाई येते आणि मुलीच्या परिस्थितीची जाणीव तिला होते. मुलीचा त्रास कमी करण्यासाठी तिला पाठीवर बसवते. 


@AwanishSharan यांनी शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते दिसत आहे. या व्हिडिओला 76,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.


त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले - ही महिला खरोखरच देवदूत आहे. दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने कमेंट करताना लिहिले आहे - हा खूप चांगला व्हिडिओ आहे.